ई श्रम कार्ड - असंघटित कामगार वर्गाचा आधार
ई श्रम कार्ड - असंघटित कामगार वर्गाचा आधार
आधार कार्ड व लिंकिंग मुळे केंद्र सरकार कडे सर्व लोकांची माहिती आहे , जसे कि ७/१२ मुळे देशात शेतकरी वर्ग किती टक्के आहे ,प्रॉव्हिडंट फ़ंड सर्व्हिस रजिस्ट्रेशन मुळे देशात नोकरदार वर्ग किती आहे तसेच पॅन व आयकर सेवा यामुळे टॅक्स पेयर वर्ग किती आहे हे समजते.
परंतु आपल्या देशात बरेच लोक कामगार , मजूर म्हणून काम करतात ज्यांची नोंद कोठही नाही जसे कि शेत मजूर , टॅक्सी ड्राइव्हर , हेल्पर औदयोगिक क्षेत्रात काम करणारे मजूर इत्यादी .
त्यांची वेगळी ओळख निर्माण व्हावी , तसेच त्यांचा स्वतंत्र डाटाबेस तयार व्हावा आणि त्याना वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळावा म्हणून ई -श्रम कार्ड बनवले जात आहे
असंघटित कामगार म्हणजे कोण आहेत ?
- शेतमजूर व इतर मजूर
- पशुपालन करणारे कामगार व मजूर
- सुतार काम करणारे स्वयंरोजगारीत व्यक्ती , मजूर
- बांधकाम ,सेंट्रिंग,वीटभट्टीवर काम करणारे मजूर
- किराणा/ बेकरी/ पानपट्टी/ इत्यादी सर्व दुकानदार
- सेल्समन, कम्प्युटर ऑपरेटर
- केश कात्रण करणारे स्वयंरोजगारीत व्यक्ती , मजूर
- घरगुती कामे करणारे मजूर
- फळ ,भाजीपाला,वृत्तपत्र विक्रेते
- हातगाडी ओढणारे मजूर
- ऑटो रिक्षा चालक
- सामान्य सेवा केंद्र ,खाजगी क्लासेस चालक
- आशा वर्कर ,अंगणवाडी सेविका
- दूध उत्पादक
- स्थलांतरित कामगार
- विडी कामगार
ई श्रम कार्ड योजनेचे फायदे -
१. घरकूल योजना, व आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळण्यासाठी फायदेशीर
२. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत फायदे
३. सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनेमध्ये नाव अंतर्भूत केले जाऊ शकते
४. असंघटित कामगारांसाठी राबवल्या जाणाऱ्या नवनवीन योजनांचा लाभ मिळू शकेल तसेच त्यांच्या क्षमतेप्रमाणे त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतात .
५. असंघटित कामगारांची माहिती सरकार कडे असल्यामुळे त्यांच्या हिताची नव नवीन धोरणे राबविण्यात मदत होईल.
६. इ श्रम हा बारा अंकी नम्बर पूर्ण भारतभर स्वीकारला जातो तसेच तो बदलला जात नाही ज्यामुळं दुर्घटना , महामारी इत्यादीमध्ये भरपाई मिळणेस मदत होऊ शकते

इ श्रम नोंदणी साठी पात्रता -
१. वय- १८ ते ५९ असावे
२. लाभार्थी इनकम टॅक्स भरणारी नसावी.
३. लाभार्थी EPFO व ESIC ची सदस्य नसावी.
४. कामगार श्रेत्रात काम करणारी असावी.
ज्या व्यक्तींचा पीएफ -PF कट होतो ,ज्याचे ESIC विमा योजनेत नाव आहे तसेच जे इन्कमटॅक्स भारतात हे या योजनेमध्ये येत नाहीत
ई श्रम कार्ड काढण्यासाठी लागणारे कागद पत्रे
१. आधार लिंक मोबाईल नम्बर
२. आधार कार्ड
३. बँक पासबुक ( आधार ला बँक अकाऊंट सीड/ लिंक झाले असल्यास पासबुक लागत नाही )
४. कामाचा तपशील
५. वारसदार ची माहिती ( कम्पलसरी नाही परंतु हि माहिती अवश्य भरावी
ई-श्रम कार्ड मिळण्याचा कालावधी
आपला अर्ज पूर्ण भरून झाले नंतर लगेचच आपल्याला हे कार्ड पीडीएफ स्वरूपात मिळू शकते , तसेच ते आपण लॅमिनेशन करून हि वापरू शकता. हे कार्ड आपण इ सेवा केंद्रात किंवा CSC केंद्रात जाऊन काढू शकता
शासनाने आपल्या असंघटित मजूर बांधवासाठी वेगवेगळ्या योजना व फायदे देणेसाठी हि योजना चालू केली असून, त्यांना एक प्रकारचा भक्कम आधार देण्याचे काम केले आहे. आपण सर्व जण पात्र लोकांपर्यत हि माहिती पोचवून त्यांना ह्या संधीचा फायदा करून देऊ.
आपण आम्हास कागदपत्रे व्हाटसप किंवा ऑनलाईन माध्यमातून पाठवू शकता आपणास आम्ही नाममात्र शुल्कात हे कार्ड काढून देऊ
आपण आम्हास कागदपत्रे व्हाटसप किंवा ऑनलाईन माध्यमातून पाठवू शकता आपणास आम्ही नाममात्र शुल्कात हे कार्ड काढून देऊ
लिंक 👉 E Shram Card Portal -
सपंर्क - ७३९७९८१००८ /७०८३८४१००८
Our Website -
Comments
Post a Comment