ई सेवा केंद्र -Stat up with Low Investment
पॅन कार्ड सेवा - नवीन व दुरुस्ती ( सेवा क्रमांक ०१)
स्वतःचे ई सेवा केंद्र -कमी खर्चात स्टार्टअप करू इच्छिणाऱ्यांसाठी तसेच स्वयंम रोजगार करणाऱ्यांसाठी माझा हा खास ब्लॉग्स.जर तुम्ही एखादे ई सेवा केंद्र चालू करणार आहात तर आपल्याला ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सर्व सेवांची माहिती असणे आवश्यक आहे.
-
पॅन कार्ड सेवा - नवीन व दुरुस्ती
पॅन कार्डची रचना-
पॅन कार्ड वरती अर्जदाराचा पॅन क्रमांक, त्याचे नाव तसेच अर्जदाराच्या वडिलांचे किंवा आईचे नाव , जन्मतारीख व छायाचित्र प्रिंट केलेलं असते
पॅन कार्ड साठी अर्ज हे २ प्रकारे केले जाऊ शकतात
१. नवीन पॅन - फॉर्म ४९ A
२. पॅन दुरुस्ती -फॉर्म CSF
१. नवीन पॅन - फॉर्म ४९ A
नवीन पॅन कार्ड साठी कोणीही अर्ज करू शकते , फक्त लागणारी कागदपत्रे वेगवेगळी असतात.कोणताही अर्जदार ज्याचे वय १८ पेक्षा जास्त आहे व व त्याने कधीही अर्ज केलेलं नाही , त्यानेच ह्या कॅटेगरीतून अर्ज करावे , तसेच ह्या कॅटेगरी मध्ये ज्याचे वय १८ पेक्षा कमी आहे ते सुद्धा अर्ज करू शकतात त्यांचे
पॅन
हे मायनर पॅन म्हणून संबोधले जाते तसेच १८ वर्ष पूर्ण झाले नंतर त्याला ते मेजर पॅन मध्ये ट्रान्सफर करावे लागते. कंपनी साठी तसेच बचत गट यासाठी लागणाऱ्या पॅन कार्ड साठी ह्याच कॅटेगरीतून अर्ज करावे लागतात.
नवीन पॅन साठी लागणारी कागदपत्रे -
A.नवीन अर्जदार -
१. आधार कार्ड ( जन्म तारीख पूर्ण असणे आवश्यक )
२. फोटो व अर्ज
नोट - जरी विवाहित महिला असेल तरीही वडिलांचे किंवा आईचे नाव कम्पलसरी लागते ,त्यामुळे ते खात्रीपूर्वक लिहावे व पूर्ण नाव द्यावे
B. मायनर अर्जदार-
१. आधार कार्ड ( जन्म तारीख पूर्ण असणे आवश्यक )
२. फोटो व अर्ज
३.
आई किंवा वडिलांचे आधार कार्ड
C. कंपनी पॅन
१.
कंपनी शिक्का - शक्यतो गोल शिक्का असावा
२.
सरकारी नोंद असेलेले कोणताही दस्तऐवज
२. पॅन दुरुस्ती -फॉर्म CSF
ज्याचे पॅन कार्ड एकदा काढलेले आहे व ज्यांना पॅन नंबर मिळाला ते दुबार अर्ज ह्या कॅटेगरीतून खालील कारणासाठी करू शकतात
१. पॅन कार्ड गहाळ झाले असल्यास
२. पॅन कार्ड खराब अथवा अस्पष्ट झाले असल्यास
३.
मायनर टु
मेजर ट्रान्सफर
४.
विवाहित महिलाचे नाव ट्रान्सफर करणेसाठी
५. पॅन मधील कोणतीही दुरुस्ती आल्यास - जसे कि नावात बदल , जन्म तारीख बदल, फोटो सही यातील बदल ,वडीलांचे नाव दुरुस्ती इत्यादी.
a. नाव दुरुस्ती - बरोबर नाव असलेले आधार कार्ड व अर्जदाराचे फोटो
b. विवाहनंतचे नाव बदल किंवा नाव ट्रान्सफर- एखाद्या महिलेचे पॅन विवाहानंतर ट्रान्सफर करावयाचे असलेस पूर्ण नाव बदलावे लागते त्यामुळे त्यांना अर्जासोबत विवाहानंतरचे
अपडेटेड आधार कार्ड सोबत सपोर्टींग डॉक्युमेंट जसे की - अपडेटेड वोटर आयडी किंवा नाव बदल राजपत्र -ग्याझेट कॉपी किंवा विवाह नोंद दाखला जोडावा लागतो.
c. जन्म तारीख दुरुस्ती साठी अर्जासोबत अपडेटेड आधार कार्ड तसेच सपोर्टींग डॉक्युमेंट जसे की बरोबर जन्मतारीख असलेले वोटर आयडी , दहावीचे सर्टिफिकेट किंवा तत्सम दस्तावेज जोडावे लागते.
Annexure A फॉर्म
पॅन कार्ड मध्ये बदल करणेसाठी जर कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नसतील तर annexure A फॉर्म अर्जासोबत जोडता येऊ शकतो. तसेच गॅझेटेड ऑफिसर किंवा लोकप्रतिनिधी यांचा सही शिक्का अर्जावर लागतो. फॉर्म सोबत ऑफिसर किंवा लोकप्रतिनिधी यांचे ओळखपत्र जोडावे लागतात .
जर फॉर्म वरती अर्जदाराचा अंगठा असेल तर त्यावरती लोकप्रतिनिधींचा सही व शिक्का घ्यावा लागतो व फॉर्म सोबत लोकप्रतिनिधींचे ओळखपत्र जोडावे लागते.
पॅन कार्ड मिळणेसाठी लागणार कालावधी-
नवीन पॅन साठी अर्ज केलेनंतर कमीत कमी १५ ते २० दिवसात पॅन कार्ड तुम्हाला तुमच्या पत्यावर मिळू शकेल.तसेच दुरुस्ती अर्ज असलेस तुम्हाला २५ ते ३० दिवसात पॅन कार्ड तुम्हाला तुमच्या पत्यावर मिळू शकेल.
तुम्हाला अर्जंट पॅन हवे असल्यास तुम्ही अर्जासोबत तुमचा चालू ई-मेल आयडी द्यावा ज्यावर ३ ते ४ दिवसात इ पॅन ची कॉपी प्राप्त होऊ शकते
खालील गोष्टी टाळाव्या
१. अस्पष्ट फोटो
२. अस्पष्ट सही
३. अस्पष्ट दिसणारी कागदपत्रे अर्जासोबत जोडू नये
सर्व माहिती अचूक दिलेस आपले पॅन कार्ड आपल्याला कमीत कमी वेळेत मिळू शकते
अर्ज कोठे करावा -
पॅन कार्ड साठी गव्हर्मेंट वेबसाईट तसेच -
https://www.pan.utiitsl.com/PAN किंवा https://www.onlineservices.nsdl.com/
किंवा तुमच्या जवळच्या पॅन मित्र एजन्ट यांना संपर्क करू शकता
आपण पॅन कार्ड खालील साईट वरून ट्रॅक करु शकतो -
https://www.trackpan.utiitsl.com/ - UTI USERS
https://tin.tin.nsdl.com/pantan/StatusTrack.html - NSDL USERS
पॅन एजन्ट कडून आपल्या अर्जाची पोच घ्यायला विसरू नका
धन्यवाद , तसेच माझा ब्लॉग आवडला असल्यास शेअर जरूर करावा
आपल्या योग्य सूचनांचे स्वागत आहे
कृपया ७०८३८४१००८ या नबंर वरती आपल्या सूचना पाठवाव्या
https://bizvectors.business.site/
Comments
Post a Comment